Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात बेशिस्त नागरिकांना दणका…..

केज दि.११ – लॉक डाउन शिथिल केला असला तरी नागरिकांनी कांही नियम पाळणे आवश्यक आहे.मात्र कांही बेशिस्त नागरिक कसल्याच प्रकारची काळजी न घेता स्वतः बरोबर दुसऱ्याचही जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. अश्याच कांही मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना नगरपंचायत च्या पथकाने दंड आकारत चांगलाच दणका दिला आहे.
          शहरातील बसस्थानकाच्या समोर गुरुवारी नगरपंचायत चे मुख्याधिकारी विशाल भोसले हे स्वतः आपल्या पथकासह ठाण मांडून बसले असून तोंडाला मास्क न घालता बेशिस्तपणे वावरणाऱ्या वाहन धारकांना तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना पकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला जात असल्याने बेशिस्त नागरिकांना चांगलाच दणका बसला आहे. सदरील कारवाईत नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सहभागी आहेत. दंड बसल्यावर तरी किमान लोकांचे डोळे उघडावेत अशी अपेक्षा.……..!
शेअर करा
Exit mobile version