Site icon सक्रिय न्यूज

एक लाख रुपयांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…….!

एक लाख रुपयांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…….!
केज दि.२७ – स्कॉर्पिओ गाडीचे पैसे देण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणले तरच नांदायला ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महिलेच्या पती विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           तालुक्यातील काशीदवाडी येथील दीपक बालाजी कदम रा. काशीदवाडी (शिंदीफाटा) याने त्याची पत्नी दिपाली कदम हिला स्कॉर्पिओ गाडीचे पैसे देण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून दि.६ डिसेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान मारहाण केली. तसेच पैसे घेऊन आलीस तरच नांदायला ये अन्यथा तुला जीवे मारील अशी धमकीही दिली. तसेच सदर कारणावरून मानसिक त्रास देत जास्तीचे काम करून घेऊन अर्धपोटी ठेवले असल्याची फिर्याद दिल्यावरून केज पोलीसांत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना रुक्मिणी पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version