Site icon सक्रिय न्यूज

साळेगावच्या दोघा भावावर तर सावळेश्वरच्या बापलेकावर गुन्हा…..!

साळेगावच्या दोघा भावावर तर सावळेश्वरच्या बापलेकावर गुन्हा…..!
केज दि.२७ – जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा भावांनी एकास हाताच्या बोटाला चावा घेत बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत बापलेकाने विद्युत डीपीचे पैसे मागत चापटाबुक्याने व काठीने मारून तरुणाचे डोके फोडल्याची घटना सावळेश्वर येथे घडली. याप्रकरणी केज व युसुफवडगाव पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.
              साळेगाव येथील दीपक शिवाजी मुळे ( वय ३५ ) हे २६ जानेवारी रोजी दुपारी ४.५७ वाजेच्या सुमारास बोलत उभे असताना त्यांच्या गावातील शाम रामा मुळे व ओम रामा मुळे हे दोघे भाऊ संगनमत करून तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. शाम याने दीपक यास मिठ्ठी मारून पकडून ठेवले. तर ओम याने हाताच्या बोटाला चावा घेत जखमी केले. त्यानंतर शाम याने लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. दीपक मुळेंच्या फिर्यादीवरून शाम मुळे व ओम मुळेविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अमोल गायकवाड पुढील तपास करत आहेत.
      दुसऱ्या घटनेत सावळेश्वर येथील उत्तरेश्वर संभाजी मस्के ( वय २३ ) यास २६ जानेवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राजाभाऊ अंबादास मस्के व सोनू राजाभाऊ मस्के या दोघा बापलेकांनी विद्युत डीपीचे पैसे मागत काठीने डोक्यात मारून डोके फोडले. चापटाबुक्याने बेदम मारहाण करीत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी ही दिली. उत्तरेश्वर मस्के यांच्या फिर्यादीवरून राजाभाऊ मस्के, सोनू मस्के या दोघा बापलेकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार तोंडे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version