केज दि.३० – विद्यार्थ्यांना अभ्यासात बळ मिळावे याकरिता केज शहरातील ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जानेवारी महिन्यातील स्टुडंन्ट ऑफ दि मंथ या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे
डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या केज शहरातील नामांकित ज्ञानज्योती कोचिंग क्लास मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे डॉ.बी.जे.हिरवे व सर्वज्ञ करिअर अकॅडमी चे संचालक श्री. बांगर यांच्या हस्ते कु. श्रुती परळकर हिचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व स्टेथोस्कोप देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.बी.जे.हिरवे यांनी शालेय पातळी पासुनच अभ्यास केल्यास 12वी सायन्सचा पाया मजबुत होतो असे सांगुन ” बाप” या कवितेचे सादरीकरण केले तर प्रा.बांगर यांनी स्पर्धा परिक्षा व संरक्षण दलातील परिक्षांचे नियोजन व भरती प्रक्रीया यावर मार्गदर्शन केले. कार्यकमाचे प्रास्तविक प्रा. अनिल रोडे, आभार प्रदर्शन प्रा. श्रीराम सारूक यांनी तर सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश कलढोणे यांनी केले.