Site icon सक्रिय न्यूज

पुरोगामी पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान…..!

पुरोगामी पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान…..!
केज दि.०२ – अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ केज शाखेच्या वतीने मूकनायक दिनानिमित्त  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने केज येथे २०२१- २०२२ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
                       संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता, प्रशासकीय, सामाजिक,आरोग्य ,शैक्षणीक,क्रीडा, पर्यावरण आणि साहित्य या क्षेत्रात यशस्वीपणे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी  पत्रकार संघाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी सन्मानित करण्यात आले. यामध्ये पञकार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर सिरसट, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ,सामाजिक पुरस्कार डॉ.गणेश ढवळे व अनिता कांबळे, निर्भिड संपादक पुरस्कार जालिंदर धांडे, शैक्षणिक उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वसंत तरकसबंद, आरोग्य पुरस्कार डॉ.अरुणा केंद्रे, उत्कृष्ट महिला समुपदेशक पुरस्कार जनाबाई खाडे ,पर्यावरण पुरस्कार डॉ.हनुमंत सौदागर, क्रीडा पुरस्कार प्रियंका इंगळे  आणि साहित्य पुरस्कार युवा कवी किशोर भालेराव, चंद्रकांत वाळुंज, युवराज राजपूत आदी  मान्यवरांना सन २०२१- २०२२ या वर्षीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
            यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  विजय सुर्यवंशी, विजयकुमार वाव्हळ, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अक्षय  मुंदडा, शिवाजी ठोंबरे, रत्नाकर शिंदे, दिपक कांबळे, हनुमंत भोसले, अरविंद थोरात, प्रा. दशरथ रोडे, भागवत वैद्य, राज्यकार्याध्यक्षा मनीषा घुले, स.का. पाटेकर, युवराज हिरवे तसेच आदर्श, सक्रिय व झुंजार पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
              या कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी अनिल वैरागे, हनुमंत गव्हाणे ,अमोल सावंत, राजकुमार धिवार यांनी नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरोगामी पत्रकार संघ केज शाखेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मुजमुले यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजीत घाडगे यांनी केले.
शेअर करा
Exit mobile version