पुणे दि.०३ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी म्हणाले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा त्याच वेळेत 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रात्याक्षिक परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल. पुर्वी ठरलेल्या पद्धतीनेच परीक्षा होतील, असं शरद गोसावी यांनी सांगितलं. बारावीसाठी 14 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत. बारावीसाठी 158 विषय आहे.