केज दि.०४ – दलित व भूमिहीन कसत असलेल्या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यांच्या तोंडातील घास हिरावण्यात येत असल्याने जर त्या प्रकल्पाचे सुरू असलेले काम थांबवले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्यात येणार असून सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही त्याचे काम न थांबविल्याने अतिक्रमण धारकांनी आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.
मागील कित्येक वर्षा पासून लव्हुरी ता. केज येथील मागास प्रवर्गातील २६ भूमिहीन शेतमजूर हे येथील सरकारी गायरान जमिनी गट नं ३५/१ मधील ८३ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण करून ती कसत आहेत. त्या जमीनीत पेरणी करून निघालेल्या उत्पादनावर कुटुंबाची गुजराण करीत आहेत. दरम्यान अतिक्रमणधारक हे ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरीत झाल्याची संधी साधून सौरऊर्जा प्रकल्पाचे काम करणाऱ्या एमएसडीसीएल कंपनीने या गायरान जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू केले आहे. ही माहिती मिळताच रिपाइं (ए)चे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्खाली सदर काम बंद करून भूमिहीनांच्या तोंडातील घास हिरावण्याच्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन केले गेले मात्र एमएसडीसीएल कंपनीची दंडेलशाही आणि मग्रुरपणामुळे काम सुरू आहे. सदर प्रकल्पाला विरोध करून त्याचे काम थांबविण्याची प्रक्रिया करण्यात यावी. म्हणून आता अंतिम पर्याय म्हणून युवा रिपाइं (ए) चे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे आणि जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं (ए) चे केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, बीड तालुका अध्यक्ष किसन तांगडे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, केज शहाराध्य भास्कर मस्के, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. जर या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रद्द केले नाही; तर दि. १० फेब्रुवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर अतिक्रमणधारक हे आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ पंढरी गायसमुद्रे, सुभाष गायसमुद्रे शिवाजी जाधव विनायक जाधव यांच्या सह्या व अंगठे आहेत. तसेच हे
निवेदन उपविभागीय आयुक्त औरंगाबाद यांनाही दिले आहे. निवेदना सोबत अतिक्रमणे सिद्ध होत असल्याची नोंदी असलेले विविध पुरावे व शासनाचे निर्णय आणि परिपत्रके जोडली आहेत.
लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला आमचा कायम विरोध असून महसूल अधिकाऱ्यांनी खोटा व दिशाभूल करणारा अहवाल सादर केला. आम्ही अनेकवेळा तहसील कार्यालया समोर त्या विराधात सनदशीर मार्गाने आंदोलने केली; परंतु शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही. म्हणून आता जर अतिक्रमणधारक भूमिहीन कुटुंबांचे उवजीवेकेचे साधन हिरावले जात असेल तर आत्मदहना शिवाय अन्य पर्याय नाही.
दीपक कांबळे, रिपाइं (ए) तालुका अध्यक्ष, केज