अंबाजोगाई दि.०४ – शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी (दि.०४) दुपारी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
निदा अल्ताफ शेख (वय १६) आणि सानिया अल्ताफ शेख (वय १८) अशी त्या बहिणींची नावे आहेत. त्या फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. शुक्रवारी सकाळी वडील त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या विहिरीत बुडाल्या. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले.
दरम्यान सदरील घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही ते पोलीस तपासात स्पष्ट होईल.