Site icon सक्रिय न्यूज

पुण्यात शिवसैनिक आक्रमक, पोलीस फुटेज तपासून दाखल करणार गुन्हा…..!

पुण्यात शिवसैनिक आक्रमक, पोलीस फुटेज तपासून दाखल करणार गुन्हा…..!

पुणे दि.०५ – गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यातच आता जंम्बो कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेमध्ये आले होते. यावेळी शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळाले.

शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये जोरदार झटापट झाल्याने किरीट सोमय्या जखमी झाले आहेत. किरीट सोमय्या यांचा एक्सरे आणि इतर तपासणी करण्यासाठी संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची इतकी आक्रमक भूमिका पाहून सुरक्षारक्षकांनी सोमय्यांना गाडीत नेण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी सोमय्या पायऱ्यांवरून खाली कोसळताना दिसले. पुणे महानगरपालिकेच्या इमारती समोर हा प्रकार अचानक घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. जंम्बो कोविड सेंटर कामाच्या भ्रष्टाचार प्रकरणी किरीट सोमय्या तक्रार देण्यासाठी गेले होते.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मी शिवाजीनगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचा पार्टनर सुजित पाटकर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरूद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितल होतं. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रक्ट मिळवला. अनेक कोविड रूग्णांचा मृत्यु झाल्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही किरीट सोमय्या म्हणाले होते.

शेअर करा
Exit mobile version