बीड दि.१० – जिल्हयात होणा-या राजकिय सामाजिक हालचाली व घडामोडींमुळे मोर्चे निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको आंदोलने या सारखे आंदोलने होण्याची शक्यता असून यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक 19.2.2022 रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता कलम 37 (1) (3) मु.पो.का. लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी दिनांक 10.2.2022 रोजीचे 00.00 वाजेपासून ते दिनांक 24.2.2022 चे 00.00 वाजेपर्यंत चे काळात जिल्हयात कलम 37 (1) (3) म.पो.का. लागु करण्यात येत आहे.
या कालावधीकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये पांच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही. तसेच पोलीस अधिक्षक बीड यांचे अहवालावरुन जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे शासकिय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येईल. यामध्ये शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत. लाठ्या काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किया फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करून ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल
ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा
इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. तसेच जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करण्यास मनाई असेल. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समोवश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/ मोर्चा काढता येणार नाही.
दरम्यान सदरील आदेश बीड जिल्हयाच्या हद्दीत दिनांक 10.2.2022 रोजीचे रात्री 12 वाजेपासून ते दिनांक 24.2.2022 चे 12 वाजेपर्यंत लागु राहतील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत. व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरी शिवाय १५ दिवसांपेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही. तसेच या आदेशाचे पालन करुन कोणाताही मोर्चा, सभा, मिरवणुक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-याची पूर्वमान्यता घेणे आवश्यक असेल, सदर आदेश दिनांक १०.२.२०२२ रोजी संतोष बनकर ( प्र. अपर जिल्हादंडाधिकारी बीड ) यांनी पारित केले आहेत.