Site icon सक्रिय न्यूज

देवगाव घरकुल प्रश्नी चौकशीचे आदेश…….!

देवगाव घरकुल प्रश्नी चौकशीचे आदेश…….!
केज दि.११ – तालुक्यातील  देवगाव येथे रमाई आवास घरकुल योजनेत २०१९-२० वर्षात मंजूर घरकुलाचे बांधकाम न करता कागदोपत्री काही बांधकाम पूर्ण तर काही सुरू असल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याचा प्रकार झाल्याची तक्रार करत महादेव दशरथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन  सहा घरकुल बांधकामाची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तक्रार प्राप्त होताच गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी विस्तार अधिकाऱ्यास चौकशीचे आदेश दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version