केज दि. १४ – तालुक्यातील सांगवी ( सारणी) येथे एका ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरच्या घरी चोरट्यानी डल्ला मारला असून सोन्याच्या दागिन्यासह नगदी १ लाख ७६ हजार रु चा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील शिवाजी गौतम केदार हे मंगवडगाव येथील ग्रामपंचायचे डाटा ऑपरेटर म्हणून काम करीत आहेत. ते सांगवी (सारणी) येथे रहात असून ते दि १३ फेब्रुवारी रोजी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी पत्नीसह गेले होते. घरी त्यांचे वडील होते. त्यांचे वडील घराशेजारी असलेल्या गोठ्यात झोपले होते. रात्रीच्या वेळी चोरट्यानी पत्रे उचकटून घरात प्रवेश करून बॅग मध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लोकेट, १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ६ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीचे मंगळसूत्र व नगदी ३० हजार रु. असा एकूण १ लाख ७६ हजार रु चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे.
दरम्यान शिवाजी केदार यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ३७/२०२२ भा.दं.वि. ४५७ व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.