केज दि.१७ – मागच्या कांही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने अनेक शेतकऱ्यांचे ऊस जळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच पुन्हा बुधवारी तालुक्यातील जाधव जवळा येथील सहा एक्कर ऊस जळाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील जाधव जवळा येथील शेतकरी सुधिर सुरेश शिंदे, सचीन रमेश शिंदे, शरद रमेश शिंदे, विजय रमेश शिंदे यांचा सर्व्हे नं 141 मधील सहा एक्कर ऊस दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमाराम शॉर्ट सर्किट झाल्याने जळुन खाक झाला.यामध्ये चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.