केज दि. १९ – शहरातील जिरायत खात्याची जागा ही अवैध धंदे करणाऱ्यांचे मोक्याचे ठिकाण झाले आहे. दिवस असो वा रात्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांची ये जा नेहमी दिसून येते. आणि त्याच जागेत केज पोलिसांनी शनिवारी दुपारी धाड टाकून अवैध दारूच्या बाटल्या जप्त करण्याची कारवाई केली.
शहरातील जिरायत खात्याच्या आजूबाजूला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. दारू अड्डे पण याच ठिकाणी असल्याने नशेबाज सतत याठिकाणी वावरत असल्याने गुन्हेगारी घटना अधूनमधून घडत असतात. अश्याच एका दारू अड्ड्यावर केज पोलिसांनी छापा टाकून भागूबाई बापू काळे या महिलेकडून देशी टॅनगो पंच दारूच्या 70 बाटल्या तर बॉबी संत्रा च्या 30 अश्या एकूण 3750 रुपये किमतीच्या 100 बाटल्या जप्त केल्या आहेत.
सदरील कारवाई एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष मिसळे, पीएसआय पाटील, एएसआय महादेव गुजर, पोना मंगेश भोले, रुक्मिणी पाचपिंडे, शमीम पाशा यांनी केली.