केज दि.२० – पोलीसांनी देशी दारू अड्डे, गावठी व हातभट्टी दारू विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पोलीसांनी केज शहरात चालणाऱ्या देशी दारू आणि हात भट्ट्यावर धाडी टाकून हातभट्ट्या नष्ट केल्या आणि देशी दारू व तयार गावठी दारू, दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले.
केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरातील गावठी दारू अड्डे व हातभट्ट्या यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. हातभट्ट्या आणि गावठी व बेकायदेशीर दारू अड्डे यांच्यावर धडक कार्यवाह्या करण्याचा सपाटा लावला आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात पोलीस पथकांनी सुमारे १६ हजार ४०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि हातभट्ट्या उध्वस्त केल्या. तसेच देशी दारू ताब्यात घेत हातभट्टीची गावठी दारू व दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. यामुळे अवैद्य दारू धंद्यावाल्यात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.