Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील एटीएम रामभरोसे……!

केज शहरातील एटीएम रामभरोसे……!
केज दि.२२ – शहरातील एसबीआय, महाराष्ट्र तसेच इतरही कांही बँकांचे एटीएम आहेत.परंतु शहरात असलेले बहुतांश एटीएम सुरक्षा रक्षकाशिवाय आहेत.रात्रीच्या वेळेस सदरील ठिकाणी संरक्षणाची कुठल्याच प्रकारची सोय नसल्याने चोरटे बिनधास्त झालेले आहेत. आणि तीच संधी साधून केज येथे पहाटे ४ वा. दरम्यान कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा दोन अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला.मात्र एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
          अधिक माहिती अशी की, दि. २२ फेब्रुवारी मंगळवार रोजी पहाटे ३:५१ वा. च्या दरम्यान केज जिल्हा बीड येथील कानडी रोड असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम दोन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ते दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी पोलीस पथकाला पाचारण करून शोध लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शेअर करा
Exit mobile version