Site icon सक्रिय न्यूज

बाप लेकाने घातला व्यापाऱ्याला गंडा……..!

बाप लेकाने घातला व्यापाऱ्याला गंडा……..!

बीड दि.२२ – पैशाचा पाऊस पाडून पाचपट पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवत बाप-लेकांनी एका व्यापाऱ्याला पाच लाखांना लुबाडले. परळीमध्ये ही घटना घडली आहे. बाप-लेकाविरोधात परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे अंगद थोरात असे नाव आहे.

                 आमिषाला भुलून या व्यापाऱ्याने पाच लाखांची रक्कम बाप लेकाला दिली. मात्र त्यानंतर पैशाचा पाऊसही पडला नाही, आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही. त्यानंतर अंगद थोरात यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. अंगद थोरात यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा हा सगळा प्रकार दसऱ्याला घडला होता असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.पैशाचा पाऊस पाडून पाचपट पैसे देण्याचे आमिष दाखवणाऱ्या परळीतल्या बाप लेका विरोधात फसवणूक आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. अंगद थोरात असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अंगत थोरात यांच्या फिर्यादीवरून परळीतल्या संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये प्रेमसागर जोगदंड आणि प्रशांत जोगदंड दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. परळी शहरांमध्ये अंगद थोरात यांचे किराणा दुकान आहे. थर्मलचे काम घेणारा गुत्तेदार प्रेमसागर उर्फ बाळासाहेब बापूराव जोगदंड याचा मुलगा प्रशांत याच्यासोबत अंगदची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. व्यापार वाढविण्यासाठी माझे वडील भविष्यात मदत करतील असे प्रशांतने अंगद आस सांगून विश्वासात घेतले होते. त्यानंतर एके दिवशी प्रशांतने अंगदला करोडपती करण्याचे आमिष दाखवले. माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत, ते आपल्या घरी येऊन विधी करतात, त्यांची सेवा केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यास पैशाचा पाऊस पडतो अशी बतावणी प्रशांतने केली. सोबतच, अंगदला विश्वास बसावा म्हणून मोबाईलवर पैशाचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ दाखवला. तुझ्या जवळील पैशाच्या पाचपट पैसे करून दाखवतील असे आमिष त्याने दाखवले. याला प्रशांतचे वडील प्रेमसागर यानेही दुजोरा दिला.

बाप-लेकांच्या भूलथापांना भुलून मागील वर्षी दसऱ्याच्या दोन दिवस अगोदर अंगदने पाच लाख रुपये, त्या बाप-लेकाकडे सुपूर्द केले. हे पैसे आम्ही महाराजांना पोहचवतो, आठ दिवसात ते तुझ्या घरी येऊन पूजा करतील आणि पैशाचा पाऊस पाडून याच्या पाच पट पैसे तुला करून देतील, असे त्यांनी सांगितले. परंतु महाराज आलेच नाहीत. महाराजांना बोलवण्याबाबत अंगदनी अनेकदा जोगदंडकडे विचारणा केली..परंतु प्रत्येक वेळी ते वेगवेगळी करणे सांगत टाळत राहिले. अखेर शंका आल्याने अंगदने त्यांना महाराजाचा पत्ता आणि रक्कम दिल्याचे बँक खाते विचारले असता त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली.. आणि इथेच आपण फसवलो गेल्याचे अंगद थोरात यांच्या लक्षात आले..

दरम्यान, मागच्या दसऱ्यापासून आतापर्यंत थोरात यांनी अनेक वेळा जोगदंड यांच्याकडे पैसे मागितले मात्र त्यांनी ते काही केल्या दिले नाहीत. अखेर अंगद थोरात यांनी या सगळ्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी परळीचे संभाजी नगर पोलिस स्टेशन गाठले आणि तिथ रितसर फिर्याद दिली. त्यावरून प्रेमसागर जोगदंड आणि प्रशांत जोगदंड या दोघांवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला

शेअर करा
Exit mobile version