Site icon सक्रिय न्यूज

१ लाख ३९ हजाराला गंडवले…..!

१ लाख ३९ हजाराला गंडवले…..!
 केज दि.२२ – येथे एका निनावी फोन वरून आलेल्या फोन मुळे चक्क एका प्राध्यापक महाशयाला १ लाख ४३ हजार रु. ला गंडविले गेले आहेत.
                    केज येथील समर्थ नगर भागात राहत असलेले शकील बशीर तांबोळी हे पुणे येथे एका कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वा ८९२१०५८४४५ या अनोळखी नंबर वरून एक फोन आला. त्याने सांगीतले की, तुमची केवायसी सेवा चालू ठेवण्यासाठी प्ले स्टोअर्स मधून एक ॲप डाउनलोड करा. नंतर १० रु. चे रिचार्ज करा असे सांगितले. त्या नंतर प्रा. शकील बशीर तांबोळी यांच्या बँक खात्यातून एकदा २५ हजार, दुसऱ्यांदा ४९ हजार ३५० आणि तिसऱ्या वेळी ६५ हजार रु. असे एकूण १ लाख ३९ हजार ३६५ रु. ची फसवणूक झाली आहे. फी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
     दरम्यान, प्रा. शकील बशीर तांबोळी यांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि. ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version