केज दि.२२ – केज अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालयासमोर एका दुचाकीस्वाराला टेम्पो ने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर सदरील इसमास उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु जागीच मृत्यू झालेला होता. सदर घटना मंगळवारी (दि.२२) रात्री घडली.
अपघातग्रस्त इसमाचे नाव सुरेश संतराम कावळे रा. परळी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.