केज दि.२२ – शहरात मागच्या कांही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस परिसरात रोड रोमिओचे घोंगावणे वाढलेले आहे.त्यामुळे शैक्षणिक वातावरण दूषित होत असून मुलींना व होतकरू विद्यार्थ्यांना याचा प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे.परंतु आता मात्र केजचे एपीआय शंकर वाघमोडे यांनी यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली असून आता रोडरोमिओंची खैर नाही.
एपीआय शंकर वाघमोडे यांनी पालक आणि शाळा, कॉलेज व क्लासेस यांना आवाहन केले आहे.यामध्ये शाळा, कॉलेज आणि क्लासेसचे पूर्ण वेळापत्रक पोलीस स्टेशन येथे द्यावे. तसेच त्या वेळापत्रकात संचालक मंडळ व क्लासेस चालवणारे शिक्षक मोबाईल नंबर देण्यात यावे जेणेकरून समन्वय राहील.
सदर कालावधीत दोन पोलीस अमलदार सतत शहरामध्ये पेट्रोलिंग करून कारवाई करणार आहे. सदर कारवाईमध्ये रोडरोमिओ स्टंट बाइक रायडर्स तसेच अल्पवयीन मुले जे की लायसन नसतानासुद्धा गाडी चालवतात त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांना सूचना द्याव्यात अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच स्टंट बाइक रायडर्स यांच्या वर न्यायालयीन खटला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे करिअर सुरू होणे पूर्वीच गुन्हा दाखल झाल्यास मोठया नुकसानीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, शाळा कॉलेजेस व क्लासेस यांनी सर्व अल्पवयीन मुलांना वाहने घेऊ नये अशा सूचना द्याव्यात. तसेच आरटीओ कार्यालय यांच्याशी समन्वय साधलेला असून ते केज मध्ये शिबीर घेणार असल्याचे माहिती मिळाली आहे त्यामुळे ज्यांच्याकडे लायसन नसतील व अपूर्ण पेपर असतील त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन शंकर श्रीराम वाघमोडे (सहा.पोलीस निरीक्षक
पो.स्टे. केज) यांनी केले आहे.