नवी दिल्ली दि.२३ – सुप्रीम कोर्टानं आज दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे. या याचिका या परीक्षांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या असल्याचं देखीलन न्यायालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता., असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे.