Site icon सक्रिय न्यूज

मोतीलाल कोठारी विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग…….!

मोतीलाल कोठारी विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग…….!
बीड दि.२३ – विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी दोन दिवशीय आंदोलनात कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयातील शिक्षकांनी संपाला पाठिंबा देत कामबंद केले.
                   कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,तीन स्तरीय वेतनवाढ तात्काळ लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय साठ करणे, यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला  चांगला प्रतिसाद मिळाला.या संपात जिल्ह्यातील मराठवाडा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मोतीलाल कोठारी विद्यालयातील  शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.शाळेच्या समोर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षकांनी घोषणा देत आंदोलन केले.
यावेळी शिक्षक संघटनेचे कृष्णा जाधव यांनी  शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी संघटनेने केलेल्या मागण्या सरकारने मान्य करण्याची मागणी केले.
               आंदोलनात मनोज सातपुते, संजय नाथ, सुरेश दळवी, सुरेश बेद्रे,  पोपट वायभासे, बबन शिरोळे, प्रल्हाद खरमाटे,संदीप चव्हाण, सुहास गोले, रवींद्र म्हस्के,अशोक म्हस्के,पुष्पलता जरे, रंजना जोशी,जयश्री भोस,सविता कर्डीले,सय्यद मॅडम यांच्यासह शिक्षकांनी सहभाग घेतला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version