Site icon सक्रिय न्यूज

बारावीच्या परीक्षेच्या कांही विषयांच्या वेळापत्रकात बदल……!

बारावीच्या परीक्षेच्या कांही विषयांच्या वेळापत्रकात बदल……!
बीड दि.२४ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दि. ०४/०३/२०२२ ते दि. ३०/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे.
                उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व व्दिलक्षी (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दि. ०५ मार्च, २०२२ व दि. ०७ मार्च, २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. ०५ एप्रिल, २०२२ व दि. ०७ एप्रिल, २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version