Site icon सक्रिय न्यूज

कॉपी मुक्तीसाठी बोर्डाने उचलले मोठे पाऊल……!

कॉपी मुक्तीसाठी बोर्डाने उचलले मोठे पाऊल……!

औरंगाबाद दि.२५ –  दहावी – बारावी परीक्षा काॅपीमुक्त, निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाकडून बैठे पथक, फिरत्या पथकांचे नियोजन सुरू आहे. विषय शिक्षकांना ते शिकवत असलेल्या विषयाच्या पेपरच्या दिवशी शाळेच्या आवारात बोलावू नये, अशा सूचना विभागीय मंडळाकडून परीक्षा मुख्य व उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत.

                             विषय शिक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त व्यक्तीशिवाय इतरांना आवारात प्रवेश न देण्याच्या सूचना बोर्डाकडून केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत. सहायक परिरक्षक (रनर) यांना याचे भत्ता व मानधन देण्यात येणार आहे. मुख्य केंद्राच्या संलग्न शाळांना उपकेंद्र घोषित केल्याने तिथे परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक शाळेला एक रनर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांची ने-आण करतील. रनर हे त्या शाळेचे नसल्याने ते बैठ्या पथकाची भूमिका बजावणार आहे. याशिवाय फिरती आठ पथके असतील. शहरी व ग्रामीण आणि अंतरानुसार पाचशे ते नऊशे रुपयांपर्यंत त्यांना मानधन देण्यात येणार असून, रनर हे बैठ्या पथकाची भूमिकाही बजावतील.
शेअर करा
Exit mobile version