केज दि.२६ – नात्यातील एकाच्या टिळ्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी गेलेली केज तालुक्यातील काळेगाव येथील २९ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे.
दि. २५ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील एक २९ वर्षीय विवाहित महिला ही तिच्या शेजारी असलेल्या एका टिळ्याच्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी म्हणून घरातून गेली. तिच्या पतीने रात्री घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. त्याला वाटले की, त्याची पत्नी ही शेजारच्या टिळ्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी गेली असावी; म्हणून त्याने पहाटे ५ वा. शेजाऱ्याकडे चौकशी केली. मात्र शेजाऱ्यांनी त्याची पत्नी ही स्वयंपाकासाठी आली नसल्याचे सांगीतले. त्या नंतर तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. म्हणून तिचा पतीने दिलेल्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात मिसींग नं. ०५/२०२२ नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता विवाहीत महिलेचा रंग सावळा, उंची ५ फूट ३ इंच, नाक सरळ, बांधा मध्यम, केस काळे व लांब, अंगावर काळ्या रंगाची साडी व अंगात लाल रंगाचे ब्लाउज, आणि पायात चप्पल असे तिचे वर्णन आहे.
सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.