Site icon सक्रिय न्यूज

पतीने स्वतःचे डोके फोडून घेतले, दारूच्या नशेत रोज मारहाण करतो….!

पतीने स्वतःचे डोके फोडून घेतले, दारूच्या नशेत रोज मारहाण करतो….!
केज दि.२६ – दारूच्या व्यसनातून पतीने स्वतःचे डोके फोडून घेतले असून रोज मारहाण करीत असल्याची तक्रार केज तालुक्यातील सांगवी येथील महिलेने  दिल्यावरून बस वाहक पतीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
    सांगवी येथील महादेव ज्ञानोबा धस हे आष्टीच्या एसटी आगारात बस वाहक पदावर कार्यरत असून त्यांना ‘तू आमच्या बहिणीला शिव्या का देतो असे कारण काढून योगेश ढाकणे, बबलू ढाकणे व पत्नी रागिणी धस यांनी दगडाने व लाथाबुक्याने मारहाण करीत डोके फोडले अशी फिर्याद दिल्यावरून या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
    दरम्यान, महादेव धस हे दारूच्या व्यसनातून रोज मारहाण करीत असून चारित्र्यावर संशय घेतात. त्यांनी आई, भावास गावी बोलावून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत स्वतःचे डोके फोडून घेत तुमच्यावर हाफमर्डरची केस करतो. अशी धमकी दिली अशी फिर्याद धस यांची पत्नी रागिणी धस यांनी दिल्यावरून महादेव धस यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version