केज दि.१३ – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज हजारो रुग्णांची नोंद होत आहे. तर एकट्या मुंबईचा वाटा यामध्ये जवळपास अर्धा आहे. हजारो रुग्ण बरे होत आहेत. मात्र कांही प्रमाणावर मृत्यूही होत आहेत. त्यामुळे मुंबईत अंत्यसंस्कार सुद्धा वेळेवर होत नाहीत. तासनतास मृताच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून मुंबई मध्ये आता एका डॅशबोर्डची सुरुवात करण्यात येणार असून याद्वारे अंत्यविधीसाठी ऑनलाइन माहिती नातेवाईकांना मिळणार असल्याने ताटकळत बसण्याची वेळ येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.