Site icon सक्रिय न्यूज

कॉंग्रेसच्या सहाही तालुकाध्यक्ष पदी नवीन चेहऱ्यांना संधी….. !

कॉंग्रेसच्या सहाही तालुकाध्यक्ष पदी नवीन चेहऱ्यांना संधी….. !
केज दि.१ – बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटी देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्या खा.रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा तालुक्याचे तालुका अध्यक्ष निवडले असून यामध्ये केज सह बीड, अंबाजोगाई, आष्टी, परळी, शिरुर या तालुक्यात काँग्रेसने तरुण व तडफदार व सर्वसामान्य जनेतशी नाळ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
         केज येथील शिवनेरी बंगल्यावर १ मार्च रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, जेष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट आदींच्या प्रमुख उपस्थितीत केजच्या तालुका अध्यक्षपदी निवडी करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये अमर पाटील (केज), गणेश बजगुडे (बीड), ईश्वर शिंदे (अंबाजोगाई), रमेश सानप (शिरूर), रविंद्र ढोबळे (आष्टी) व अनिल जाधव (परळी) यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिली असून यावेळी या सर्व नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांना पक्ष वाढीसाठी सूचना देऊन पक्षाचे काम अधिक बळकटीने करावे व पक्षाचे व नेत्यांचे हात मजबूत करावेत अशा सूचना यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देखमुख यांनी दिल्या.
           नवनिर्वाचित अध्यक्षांना यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, प्रविण शेप, ताहेर खुरेशी, कपिल मस्के, विनोद शिंदे, कबिरोद्दीन इनामदार, दलिल इनामदार, दिनकर राऊत, मुज्जू खुरेशी, भैय्या शिंदे, मुज्जू तांबोळी, सचिन रोडे, आकाश गायकवाड, अरुण गुंड, अशोक गायकवाड, अभिजित सत्वधर यांच्यासह अनेक  काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version