Site icon सक्रिय न्यूज

केजमधून लेबर पुरवठा अधिकाऱ्याचे अपहरण……! 

केजमधून लेबर पुरवठा अधिकाऱ्याचे अपहरण……! 
केज दि.१ – आर्थिक व्यवहारातून एका मजूर पुरवठा अधिकाऱ्याचे केज तालुक्यातून अपहरण करीत कर्नाटक राज्यातील शंकेश्वर साखर कारखान्यावर डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर उर्फ सुदाम हनुमंत चाळक ( वय ५५ ) हे महालक्ष्मी साखर कारखान्यावर लेबर पुरवठा अधिकारी पदावर खाजगी नोकरीस आहेत. ते १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले होते. या संदर्भात केज पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्यांचा शोध सुरू असताना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास सुधाकर चाळक यांनी त्यांचा मुलगा अक्षय चाळक यास फोन करून १२ लाख रुपये घेऊन कर्नाटक राज्यातील शंकेश्वर साखर कारखान्यावर ये असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुसरा मुलगा विशाल चाळक यास फोन करून बारा लाख रुपये घेऊन येण्यास वडिलांनी सांगितले. नंतर बाजुच्या व्यक्तीने फोन घेऊन हिंदी भाषेतून ‘तुम्हारा पापा गरिब लोगो का पैसा लेके गया है, पैसा वापीस नही लाया, तुम तुम्हारी जमीन बेचकर पैसा कर्नाटक को लेके आवो असे म्हणत सुधाकर चाळक यांना मारहाण केल्याने त्यांचा रडण्याचा आवाज येत होता. नंतर पैसे आणुन दया नाही, तर तुझ्या वडीलांना जिवच मारून टाकू अशी धमकी दिली. यावरून आर्थिक व्यवहारातून सुधाकर चाळक यांचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्याने अक्षय चाळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात जमादार चाँद सय्यद हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version