Site icon सक्रिय न्यूज

सुमारे दीड लाखाचे दागिने पळवले……!

सुमारे दीड लाखाचे दागिने पळवले……!
केज दि.२ – येथे चालत्या बसमध्ये एका महिलेच्या गळ्यातील १ लाख ४८ हजार रु चे गंठन चोरट्यानी लांबविले आहे.
           दि. १ मार्च रोजी दुपारी ४ ते ४.३० वा. च्या दरम्यान हरिदास शंकर नेहरकर रा. कोंडूळवस्ती पिसेगाव यांची सून ही केज-कळंब गाडीने कळंबकडे प्रवास करीत असताना तिच्या गळ्यातील ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन अज्ञात चोरट्यानी लांबविले. त्याची किंमत १ लाख ४८ हजार रु. आहे.
         सदर प्रकरणी हरिदास नेहरकर यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२/२०२२ भा.दं.वि. ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version