मुंबई दि.३ – कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात हाहाकार माजवला होता. आता कोरोना विषाणूचा कहर कमी होत चालला आहे. कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे पुन्हा सगळं पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सरकारनंही निर्बंधांमध्ये शिथिलता केली होती. अशातच आता राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे.
राज्य सरकारनं दिलेली नवीन नियमावली 4 मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर इतर जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर, या 14 जिल्ह्यांमध्ये हे नवी नियमावली लागू होणार आहे.
दरम्यान, इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम राहणार आहे. त्यामुळे आता महराष्ट्राची वाटचाल अलाॅकच्या दिशेनं होत असल्याचं पहायला मिळत आहे.