Site icon सक्रिय न्यूज

गणितीय मॉडेलच्या आधारावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं भाकीत……!

गणितीय मॉडेलच्या आधारावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं भाकीत……!

नवी दिल्ली दि.4 – देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रूग्णसंख्या हजारांहूनही कमी झाली आहे त्यामुळे नागरिक गाफील झालेले पाहायला मिळत आहेत.

कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असला तरी कोरोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या 100च्या पुढे आहे. ही आकडेवारी बघता कोरोना आता संपुष्टात येत असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. तर काही शास्त्रज्ञ गणितीय मॉडेलच्या आधाराने कोरोनाच्या चौथ्या लाटेचं भाकित करत आहेत.

ICMR संचालक आणि औषध तज्ज्ञ डॉ. अरूण शर्मा यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट येत नाही तोपर्यंत कोरोनाची मोठी लाट येण्याची चिन्ह नाहीत. ओमिक्रॉन नंतर दुसरा कोणता व्हेरिएंट आढळून आला नाही त्यामुळे पुढच्या लाटेची शक्यता नाही, असं डॉ. शर्मा म्हटले.

दरम्यान, भारतात कोरोनाची फक्त तिसरी लाट आली आहे. मात्र, परदेशात कोरोनाची चौथी, पाचवी लाट आली. त्यामुळे भारतात उशीराने का होईना पण कोरोनाची पुढची लाट येणार, असं मत डॉ. अरूण शर्मा यांनी व्यक्त केलं आहे.

शेअर करा
Exit mobile version