Site icon सक्रिय न्यूज

२ लाख १६ हजार रु च्या इंधनासह ४२ लाख १६ हजारचा रु. मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात…….!

२ लाख १६ हजार रु च्या इंधनासह ४२ लाख १६ हजारचा रु. मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात…….!
केज दि.६ – आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पुन्हा एकदा केज मध्ये बनावट इंधनावर धाडसी कार्यवाही करून दोन ट्रक आणि २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य इंधन ताब्यात घेत ४२ लाख १६ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ५ मार्च शनिवार रोजी केज तालुक्यातील कोठी येथे बोअरवेलच्या मशीन मध्ये बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत असल्याची माहिती सिंघम आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्या नंतर पंकज कुमावत यांनी स्वतः तेथे जाऊन कार्यवाही केली त्यावेळी रात्री कोठी येथे ८:३० वा. क्र. (के ए-०१/ सी-१६०७) आणि क्र. (के ए-०१/ ए के- ५६१२) या दोन गाड्या उभ्या होत्या. त्या पैकी एका गाडीत बोअर घेण्याची मशीन होती. त्या मशीनच्या गाडीत पाईप आणि मोटारद्वारे बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत होते.
पोलीसांनी ते दोन वाहने आणि त्यांचे चालक केरथोनम कानदासामी, पलनीवेल एल. लक्ष्मण, आर. दामोदरन रामलिंग तिघे रा. तामिळनाडू राज्य यांच्याकडे चौकशी केली असता हे दोन्ही ट्रक हे कर्नाटक राज्यातील एस. सेन्थलकुमार सेलवराज यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
पोलीसांनी दोन्ही वाहने व त्यांचे चालक यांना पोलीस ठाण्यात घेऊन तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनात २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य बनावट इंधन ज्याची किंमत २ लाख १६ हजार रु. आणि दोन ट्रक व मशीनसह ४२ लाख १६ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, अशोक नामदास, अमोल गायकवाड, वंजारे, वाहनचालक सहाय्यक फौजदार कादरी यांनी कारवाई केली.सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेअर करा
Exit mobile version