बीड दि.६ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार बाळासाहेब ठोंबरे यांची बीड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदी तर माजी जि. प.सदस्य सुरेश तात्या पाटील यांची जिल्हाउपाध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी निवड केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पटेल, बीड जिल्हा प्रभारी देविदास भन्साळी बीड जिल्हयाच्या नेत्या रजनीताई पाटील, खासदार तथा अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या सदस्या हे विद्यमान भाजप सरकारच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणा-या धोरणांवर तसेच सर्व सामान्य जनतेला भेडसावणा-या महागाई आणि भ्रष्टाचार या सारख्या गंभीर विषयांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे कॉग्रेस सरकार राज्यात व देशात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दरम्यान आपणही काँग्रेसच्या मार्फत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल याची खात्री आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या व आपले सर्वांच्या लाडक्या नेत्या अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी व आपले सर्वांचे लाडके नेते खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सर्वसामान्याना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपण दिवस-रात्र मेहनत घ्याल अशी आशा राजेसाहेब देशमुख यांनी निवडपत्रात व्यक्त केली आहे. तर दिनकर राऊत यांचीही ओबीसी सेलच्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वचिस्ट बडे यांनी दिनकर राऊत यांना दिले आहे.