Site icon सक्रिय न्यूज

महिला दिनी केज पोलीस देणार मुलींना कराटे प्रशिक्षण…!

महिला दिनी केज पोलीस देणार मुलींना कराटे प्रशिक्षण…!
  1. केज दि.७ – आंतर राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केज पोलिसांच्या वतीने मुलींना संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत निर्माण व्हावी म्हणून मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
           दि. ८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे. या निमित्त केज पोलीसांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिच्या अंगी हिम्मत यावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांचे संकल्पनेने आणि अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई व सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली केज पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ८ मार्च रोजी मुलींसाठी पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे आहे. हे प्रशिक्षण शिबीर महिला पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली घेण्यात येणार आहे. तेव्हा पालकांनी आपल्या मुलींना वेळेवर हजर करून या मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी केले आहे. तसेच पोलीस अधिकारी यांचे मार्फत मुलींसाठी कायद्याने त्यांचेसाठी दिलेले संरक्षण, या बाबत पण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेअर करा
Exit mobile version