मुंबई दि.9 – अनेक भागात उष्णतेचा पारा वाढत असताना राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर दिसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यात 9 आणि 10 मार्च रोजी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
9 मार्च रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. तर 10 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहिल.
दरम्यान, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने yellow अलर्ट जारी केला आहे.