Site icon सक्रिय न्यूज

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात……!

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात……!
मुंबई दि.९ – महाविकास आघाडीतील मंत्री आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर हजारो कार्यकर्त्यांना मेट्रो सिनेमा परिसरात अडवले आहे.
                               देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना घेऊन पोलिसांची ही गाडी सध्या रवाना झाली असून भाजपच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. इथून कार्यकर्ते पुढे विधानभवनाच्या किंवा मुंबईत इतर कोणत्याही दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलिसांनी हा मोर्चा बॅरिगेटिंग लावून अडवलेला आहे. काही वेळापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी त्यांचे संकेत दिले होते की आम्ही कदाचित विधानभवनाच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न करू मात्र असा कोणताही प्रयत्न होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आणि प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
             भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य बडे नेतेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
शेअर करा
Exit mobile version