शिराळा दि.११ (अमोल पाटील) शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच किरण पाटील, उपसरपंच लक्ष्मण सुरले, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक लक्ष्मण पाटील, भीमराव कदम, माजी सरपंच पांडुरंग पाटील व लिलावती सुतार, माजी उपसरपंच सरपंच शोभाताई पाटील, गणेश पाटील व विश्वास पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिराबाई पाटील, विवेक खिलारे, रंगराव पाटील, रंगराव नांगर, बाळासाहेब कांबळे, किसन मोर, बापूसो पोतदार, अभिजीत पाटील, शालन पाटील, प्रदीप पाटील, अभिजीत पाटील, प्रशांत पाटील, शंकर पाटील, बाळकृष्ण कांबळे, शालन पाटील, जे. के. पाटील, रंगराव पाटील व ग्रामसेवक योगेश नाईक यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.