शिराळा दि.१२ – (अमोल पाटील, सांगली) – ग्राहकांच्या समस्या, प्रश्न समन्वयातुन सोडवणे हा जिल्हा ग्राहक पंचायतीचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा पंचायतीच्या प्रतिनिधी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या सौ. सुखदा महाजन यानी शिराळा येथे केले. जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक प्रबोधन पंधरवड्यात विविध शासकीय कार्यालय सदिच्छा भेटीचे नियोजन करण्यात आले आहे त्यावेळी भूमि अभिलेख कार्यालयात त्या बोलत होत्या.
जागो ग्राहक जागो हे ध्येय उपाशी बाळगून ग्राहक पंचायत, सांगली हि ग्राहक संघटना अनेक वर्ष काम करत आहे. वर्ष विविध कार्यक्रम घेऊन ग्राहक प्रबोधन केले जात आहे.१५ रोजी जागतिक ग्राहक दिन आहे यानिमित्ताने जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणजे प्रबोधन पंधरवडा सुरू करण्यात आला आहे. शिराळा ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी विविध कार्यालयात सदिच्छा भेट देऊन येथील कामाची माहिती घेतली. चांगले काम व उणीवा याबाबत अधिकार्याशी चर्चा केली. येथील भूमी अभिलेख, उपविभागीय येथे गेली ६ महिने प्रमुख नाही, या ठिकाणी २१ मजुर पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. याबाबत गेली अनेक दिवस लोक ओरडत आहेत. यामुळे कार्यकर्ते प्रथम या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. कामावर असणार्या कर्मचारी यानी सहकार्य दिले.अनेक उणीवा दिसुन आल्या यामध्ये भूमिलेख मध्ये असणार्या शिपायाला ड्रेस नाही तर पुरवठा खात्यात तर शिपाईच नाही.भूमिलेख मध्ये माहिती अधिकार्यांचे नाव नाही , ईमेल व ईमेल आयडी नाही. कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १८/११/२०१८ च्या आर. टी. आय. बाबतच्या परिपत्रकानुसार दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत माहिती मोफत पाहण्याचा फलक नाही, कार्यालयात सी.सी. टी. व्ही. नाहीत, कर्मचारी यांच्यासाठी बयोमेट्रिक प्रणाली नाही, कर्मचार्यानी ओळखपत्र लावले नव्हते, कर्मचार्यांच्या टेबलावर व केबीनवर नावाचे फलक नव्हते, नागरिकांचा तक्रार निवारण दिन असणारा फलक नव्हता. कार्यालयात स्थानिक तक्रार अधिकारी यांचा फलक लावला नाही. येणार्या लोकासाठी पाण्याची सोय नाही, दिंव्याग व जेष्ठ नागरीकासाठी वेगळी सोय नाही, वीजपुरवठा खंडीत झाला तर पर्यायी सोय नाही. कार्यालयात समन्वय समितीच्या सदस्यांच्या यादीचा फलक लावलेला नाही. अशा अनेक त्रुटी आहेत. या सर्व सुविधा नागरीकाना मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल यानी ग्राहक सरंक्षणच्या सदस्या सौ. सुखदा महाजन यानी सांगितले.पण पुरवठा खात्यात दोन त्रुटी वगळता अन्य माहितीचे फलक लावले असुन नागरीकासाठी सर्व सोयी असल्याने ग्राहक पंचायतीच्या सदस्यानी समाधान व्यक्त केले. शिराळा तहसिलदार कार्यालय आय.एस. ओ. मानांकासाठी प्रयत्न करत असल्याने फलक व सोयी आहेत.यावेळी सुमंत महाजन,विकास शहा, वसंतराव यादव, बी. टी. निकम, सौ. सुखदा महाजन, किशोर पवार, रविंद्र कदम, स्वानंद महाजन उपस्थित होते. तपासणी अहवाल जिल्ह्याला पाठवला जाणार आहे.