केज दि.१३ – तालुक्याच्या नकाशावर नेहमीच सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेञात महिला वरचढ ठरलेल्या दिसतात. गेल्या वीस वर्षापासुन मुला पेक्षा मुलीच शैक्षणिक आणि विशेषतः वैद्यकीय क्षेञातही अव्वल ठरतांना दिसु लागल्या आहेत.केज सारख्या ग्रामिण भागात राहुनही सांस्कृतिक क्षेञाच्या कला गुणांना जोपासतच वैद्यकीय शिक्षणाची जिद्द ठेवली व ती आजच्या यशाने ती ऋतुजाने खरी करुन दाखवली. शिवसेना महिला आघाडीच्या सह संपर्क प्रमुख सौ.रत्नमाला ताई शिवदास मुंडे व पाठलागचे संपादक शिवदास मुंडे यांची ही कन्या आहे.ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील बी.आर.हरणे मेडीकल कॉलेजला तिचा बी.ए.एम.एस. साठीप्रवेश निश्चित झाला असुन या कॉलेजचा चॉईस कोड मिळाला आहे. वैद्यकीय शिक्षण घेवुन आरोग्य सेवेची सुवर्ण संधी मिळणार आहे.
ती केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदीर ची विद्यार्थीनी असुन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत ती नेहमीच अग्रेसर असते. अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या शिक्षणासाठी ती देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे होती.तिथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या काव्य वाचन स्पर्धेत प्रथम होती हे विशेष…..!
तिच्या या घवघवीत व नेञ दिपक यशामुळे कु.ऋतुजाचे सर्वच थरातुन अभिनंदन होत आहे.