Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना……!

केज तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना……!
केज दि.१३ – तालुक्यातील वेगवेगळ्या गावात दोन महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या असून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            दि. ११ फेब्रुवारी रोजी एका गावात रात्री पावणे बाराच्या सुमारास  आरोपीने ३० वर्षीय पीडितेच्या तोंडावरील रग ओढुन वाईट हेतुने डाव्या हाताला धरुन केस ओढुन विनयभंग केल्या प्रकरणी सुदाम नामदेव साबळे र.जिंतूर ता.सेनगाव याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धन्यापाल लोखंडे हे करत आहेत.
             तर अन्य एका घटनेत तालुक्यातील एका गावात फिर्यादी महिलेची जाऊ घरात एकटीच असल्याची संधी साधून दि.८ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. एकाने सदर महिलेच्या घरात घुसून महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य केले. पीडित महिलेच्या जावेच्या तक्रारीवरून सुंदर भीमराव जाधव रा. शिंदी ता.केज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. सोनवणे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version