केज दि.१४ – मागच्या महिनाभरात तालुक्यात आग लागून ऊस जळल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.त्यातच दि.१४ रोजी दुपारी तालुक्यातील गोटेगाव शिवारात आग लागून सात एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सदर आग ही उसाच्या शेजारीच असलेल्या डीपी मुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.
गोटेगाव येथे बारल शिवारात दादासाहेब विश्वनाथ रोडगे यांनी सात एक्कर ऊस केला होता. ऊस तोडणीला आला असताना सोमवारी दुपारी अचानक उसाला आग लागली आणि कांही मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण केले. सदरील आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आग नियंत्रणात आली नाही. त्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. कळंब येथून अग्निशमन दलाची गाडीही आली होती मात्र त्याचा उपयोग झाला नाही.