Site icon सक्रिय न्यूज

मेडिकल स्टोअर्स मालकाची आत्महत्या……!

मेडिकल स्टोअर्स मालकाची आत्महत्या……!
किल्लेधारूर दि.१४ – येथील औषध विक्रेते शाम आप्पाराव तिडके (वय 48 ) यांनी आज त्यांच्या राहत्या घरी काही वेळा पुर्वी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
           धारुर शहरातील उदयनगर भागातील रहिवाशी शाम आप्पाराव तिडके यांनी आज दि.14 सोमवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पत्नी शाळेतून घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी गर्दी केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या माहितीनूसार तिडके हे गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. तिडके याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तिडके यांचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे.
              दरम्यान,  तिडके यांच्या पत्नी या खाजगी संस्थेत सहशिक्षिका तर दोन मुलंं वैद्यकिय शिक्षण घेत आहेत. शाम तिडके यांचा मोठा मित्र परिवार असून व्यापारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.
शेअर करा
Exit mobile version