Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड..…..!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड..…..!
अंबाजोगाई दि.१४ – येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष सत्र केस नं. 78/2020 महाराष्ट्र शासन वि. अशोक मारुती सरवदे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष व सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.
                प्रकरणातील आरोपी अशोक मारुती सरवदे, रा. साबला, ता. केज याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आरोपीस सदरचे प्रकरणात मा. न्यायालयाने जामीन दिला असता व जमानतीवर सुटल्यावर सदर आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला व नवरा बायको सारखे राहून ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुध्दा अनेकवेळा बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदर अल्पवयीन पिडीतेस साबला, ता. केज येथून पळवून नेले व अनेकवेळा बलात्कार केला. सदर फिर्यादीवरून दि. २८/०९/२०२० रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. 405 / 2020 कलम ३६३, ३७६,३७६ (J) (n) भा.द.वी सहकलम ४,६,८,१० बा. लें. अ.प्र. का. अन्वये गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरुंगात ठेवूनच चालविण्यात आले.
                    सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष व सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.
                       या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना ऍड. आर. एम. ढेले व ऍड. नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे. कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.
शेअर करा
Exit mobile version