Site icon सक्रिय न्यूज

सुरू असलेल्या दहावी बारावी परिक्षे संदर्भात बोर्डाचा महत्वपूर्ण निर्णय…..!

सुरू असलेल्या दहावी बारावी परिक्षे संदर्भात बोर्डाचा महत्वपूर्ण निर्णय…..!

पुणे दि.१६ – 16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे. म्हणजेच सकाळच्या सत्रात साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रात 3 वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यास प्रवेश न नाकारला जाणार आहे. बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे परीक्षेला विद्यार्थी दिलेल्या वेळेत पोहोचू शकला नाही तर त्याला परीक्षा कक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही

सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50  मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल, विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल, मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

या आधीच्या नियमांमध्ये पेपरचे लिखाण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जायचं मात्र अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षेचे लिखाण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटे उशीर झाल्यास विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रस्तरावर केंद्र संचालकाकडून परवानगी देण्यात येत होती. दहा मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास केंद्र संचालक मंडळाचे विभागीय सचिवांची मान्यता घेऊन कारणाची खातरजमा करून अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश देण्याबाबत परवानगी दिली जायची. मात्र आता परीक्षा लेखन सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीची परवानगी विद्यार्थ्याला दिली जाणार नाही.

दरम्यान, बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ काही विद्यार्थी घेत असून त्या दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा काही भाग निदर्शनास आला.  परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडण्याच्या तक्रारी समोर आल्या ही बाब गंभीर असून यामध्ये काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठीच बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version