केज दि.१६ – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारून येवता ता.केज येथे एका पान टपरीतून २५ हजार ३०० रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली. याप्रकरणी टपरी चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील जमादार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक सचिन अहंकारे यांचे पथक येवता परिसरात अवैध धंद्याची माहिती काढून छापा मारण्यास गेले असता येवता येथील संतोष वसुदेव राऊत हा पान टपरी चालक सर्रासपणे गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सदर टपरीवर छापा मारून झडती घेतली असता गोवा गुटख्याचे ४७ पुडे, बाबा पान मसालाचे २२ पुडे, बाबा कंपनीची सुगंधी तंबाखु पत्तीचे २३ पुडे, विमल गुटख्याचे १६ पुडे, एक्का गुटख्याचे ६ व इतर गुटखा व सुगंधी तंबाखूचे पुडे आढळून आल्याने पथकाने हा २५ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. जमादार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादीवरून टपरी चालक संतोष राऊत याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.