Site icon सक्रिय न्यूज

कार व मोटार सायकल अपघात, केज कळंब रोडवरील घटना…..!

कार व मोटार सायकल अपघात, केज कळंब रोडवरील घटना…..!
केज दि.१८ –  मोटार सायकल व कारची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघे जखमी झाले आहेत.
          अधिक माहिती अशी की, दि. १८ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी ६:३० वा. दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथील शंकर विद्यालया जवळ केज कडून येत असलेल्या चालत्या स्विफ्ट डिझायर गाडीला क्र. (एम एच-०४/एफ एफ-४९५५) पश्चिम दिशेच्या आडव्या शेत रस्त्याने येणारे युनूस बागवान (रा. कळंब जि. उस्मानाबाद) व चंद्रकांत भालेराव (रा. माळेगाव ता. केज) त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र (एम एच-२५/९५४९) चालत्या कारला चालकाच्या बाजूने धडक दिली. यात युनूस बागवान आणि चंद्रकांत दहातोंडे या दोघा मोटार सायकल स्वार यांच्या पायाला मार लागून जखमी झाले आहेत.
              अपघाताची माहिती परमेश्वर लांडगे आणि फेरोज सय्यद यांनी पत्रकार गौतम बचुटे यांना देताच त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्या नंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, अशोक नामदास, अशोक गवळी हे सरकारी वाहनाने घटना स्थळी हजर झाले. दरम्यान जखमी मोटार सायकलस्वार युनूस बागवान व चंद्रकांत दहातोंडे यांना साळेगाव येथील संतोष मेडकर व दिनकर पोपळघट यांनी त्यांना साळेगाव येथील खाजगी रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार केले.
शेअर करा
Exit mobile version