Site icon सक्रिय न्यूज

कार मोटारसायकल अपघातात दोघे ठार, पाच शिक्षक जखमी……!

कार मोटारसायकल अपघातात दोघे ठार, पाच शिक्षक जखमी……!

बीड दि.१९ – इर्टीगा कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन यामध्ये दुचाकीवरील दोघे ठार तर १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून, कारमधील ५ असे एकूण सहा जण जखमी आहेत. या सर्वांना बीड व‌ नंतर अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कार मधील ५ ही जखमी शिक्षक असून ते माजलगाव ते अंबाजोगाई असा अप्डाउन करतात.

                   लक्ष्मण भिमराव विघ्णे ( वय ४५ वर्ष ), सिध्देश्वर प्रल्हाद जाधव ( वय ३५ वर्ष ) असे मयताचे नावं आहेत. हे दोघे व सिध्देश्वर यांचा मुलगा इश्वर जाधव  पाहूण्याना भेटून दुचाकीवर येत होते. दरम्यान तेलगाव-माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विघ्णे आणि सिध्देश्वर जाधव हे ठार झाले. तसेच इश्वर जाधव ( वय १० वर्ष ) हा गंभीर जखमी झाला. तसेच इर्टीगा कार ही खड्ड्यात जाऊन पडली असून यातील नामदेव हेडे ( वय ४४ वर्ष ), परमेश्वर खेमाजी पवार ( वय ४५ वर्ष ) प्रीती विनोद पोखरकर ( वय ३५ वर्ष ), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर ( वय ३७ वर्ष ), ज्योती शंकर कदम जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. अंबाजोगाई येथे रहातात व तेथून माजलगाव येथे शाळेसाठी अप्डाऊन करतात. आजही नेहमी प्रमाणे शाळेला जाताना शिंदेवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version