रशिया-युक्रेन युद्धाला दिवसेंदिवस भयावह रूप येत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले यामुळे युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेन सैनिकांसह शेकडो सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला.
युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला न्युक्लीअर वॉर ड्रिल अर्थात अणुयुद्ध सराव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगाचं टेंशन वाढलं आहे. रशियाने दोन दिवसांपूर्वी युक्रेनवर ‘किन्झल हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र हल्ला केला. 2 हजार किमी मारक क्षमता असलेल्या किन्झलचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी देखील वापर करू शकतो. त्यामुळे रशियाने किन्झलचा वापर करून त्यांचं पुढचं पाऊल स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पुतिन यांच्या या निर्णयाचा परिणाम भयानक होऊ शकतो, असं क्रेमलिन येथील अधिकाऱ्यांचं देखील मत आहे. व्लादिमीर पुतिन स्वत: युद्धसरावात सहभागी होणार असून त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियातील एका हायटेक अंडरग्राऊंड बंकरमध्ये हलविलं असल्याचं समोर येत आहे.