बीड दि. 22 – धारुर पोलिस हद्दीतील आडस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांने गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकास लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई आज मंगळवारी (दि. 22) सायंकाळच्या सुमारास आडस ता. केज येथे करण्यात आली.
तेजस ओव्हाळ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते धारुर पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारास गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना केज तालुक्यातील आडस परिसरात बीड एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
दरम्यान, या प्रकरणी धारुर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या पथकाने केली आहे.